औरंगजेबाचा विषय कशासाठी?   

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सवाल

बंगळूरू : औरंगजेब हा सध्याचा संयुक्तिक मुद्दा नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणत्याही हिंसेचे समर्थन करत नाही, असे संघाचे प्रचारप्रमुख सुनिल आंबेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने औरंगजेबाची कबर हटविण्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर संघाने संघटनांच्या आंदोलनावर आणि नागपूर हिंसाचारावर काल भाष्य केले असून त्यांचे कान टोचल्याचे मानले 
जात आहे. 
 
सुनिल आंबेकर यांना नागपूरातील हिसांचारावर विचारले. तेव्हा ते म्हणाले, कोणत्याही प्रकारची हिंसा समाजासाठी चांगली नसते. औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा हा संयुक्तिक आहे किंवा तेथील कबर उखडण्यात यावी का?  या प्रश्नावर ते म्हणाले की, हा मुद्दा संयुक्तिक नाही.संघाने घेतलेल्या भूमिकेवर विहिंपचे गोविंद शेंडे यांनी वृत्तवाहिनीला  प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, हिंसाचार सहन केला जाणार नाही, असे सुनिल आंबेकर म्हणाले ते सत्य आहे. हिंसाचार आम्ही करत नाही हे पण सत्य आहे. हिंदू समाज हा फार उदात्त विचार घेऊन चालणारा आहे. हिंदू समाज कोणताही हिंसाचार करत नाही आणि त्याचे कधीही समर्थन करत नाही.

Related Articles